Food & Beverages - Pune, Maharashtra, India
नादब्रम्हा डोसा इडली ची सुरुवात...२०१२ मध्ये एका छोट्याश्या हात गाडीवर नादब्रम्हा डोसा सेंटर या नावाने व्यवसाय सुरू केला.व्यवसाय सुरू करताना आमच्या मनात एकच संकल्प होता, तो म्हणजे ग्राहकांना उत्कृष्ट पदार्थ द्यायचा.तो पदार्थ खाल्यानंतर ग्राहकांना कोणत्याही प्रकारची (जळजळ होणे,पित्त होणे, व इतर ) त्रास होणार नाही याची काळजी घेतली. इतर पदार्थाचे गुणधर्म आम्ही जेव्हा पडताळून पाहिले तेव्हा एकाच नाव समोर आले ते म्हणजे डोसा इडली.आणि आम्हाला आनंद झाला की आपण ग्राहकांच्या हितासाठी जे काही शोधत होतो ते सर्व ह्या पदार्थामध्ये आहे आणि आपण ते ग्राहकांना देऊ शकतो.तेथून पुढे ३ वर्ष आम्ही दिवस रात्र मेहनत करून आम्ही सर्व नादब्रम्हाच्या डायरेक्टरांनी चव फायनल केली.चव फायनल करत असताना आम्हाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.ग्राहक बोलू लागले की तुमच्या डोसा इडली सारखी चव इतर कोठेही मिळत नाही.काही ग्राहकांना नेहमीच प्रश्न पडायचा की नादब्रम्हाची सांबर आणि चटणी चविणे अप्रतिम आणि फ्रेश नेहमीच कसे काय मिळते काही ग्राहकांनी आम्हाला प्रश्न देखील विचारले हे कस काय शक्य आहे.? तेव्हा आम्ही सांगायचो आम्ही कोणताही पदार्थ बनवून ठेवत नाही तर तो आम्ही फ्रेश बनवून देतो.नेहमी आमचा ध्यास एकाच आहे की ग्राहकांना नेहमी ताजे आणि चविष्ट डोसा इडली मिळावे.ग्राहकांना आमची ही पद्धत आवडत गेली आणि ग्राहक आमच्याशी जोडले जाऊ लागले.पुढे जाऊन ग्राहकांच्या आग्रहास्तव आम्ही भारती विद्यापीठ येथील हॉटेलचे नवीन रूपांतर करून ६ फेब्रुवारी २०१८ ला पहिले नादब्रम्हा डोसा इडली हॉटेल चालू केले. हॉटेल चालू झाल्यांतर उत्कृष्ट सेवेचा ध्यास घेऊन आम्ही काम करत असताना आम्हाला अनेक ठिकाणाहून फ्रेंचाइजी साठी फोन येऊ लागले.आम्ही खूप अभ्यास करून आराखडा तयार केला. आम्ही विस्तार करत असताना ग्राहकांना विश्वस्थ करतो की आमचे सर्वात प्रथम प्राधान्य हे आहे की सर्व शाखांमध्ये एकच चव ठेऊन,स्वछ आणि आनंदी वातावरण ठेवत ग्राहकांना सेवा देत राहणे. आपण देत असलेला प्रतिसाद व प्रेम सदैव आमचे पाठीशी राहो ही सदिच्य्छा....
Gmail
WordPress.org
Google Tag Manager
Mobile Friendly
YouTube