हजारो वर्षांचा इतिहासाची ओळख असलेला महाराष्ट्र, अनेक थोर राजे महाराज्यांचे शौर्य ते प्रभू रामचंद्रांच्या सहवास अनुभवलेला महाराष्ट्र, महाराष्ट्र ज्यात अनेक क्रांतिकारी घडले, मुघलांचा संहार करण्यासाठी करून दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र.ज्ञान, विज्ञान, आणि संस्कृती जपणारा महाराष्ट्र, स्वाभिमान आणि अभिमानाची जगाला ओळख करून देणारा महाराष्ट्र. शिक्षण असो वा क्रीडा क्षेत्र, कला असो वा संगीत क्षेत्र नवनवीन उच्च कोटीचे कलाकार देणारा महाराष्ट्र.छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, टिळक – आगरकर – राजगुरू – स्वा. सावरकर – चाफेकरांचा महाराष्ट्र, फुले – शाहू – आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर – संत तुकाराम – संत एकनाथांचा महाराष्ट्र, पंढरीच्या पांडुरंगाचा महाराष्ट्र.झाशीची राणी – अहिल्याबाई होळकर – मासाहेब जिजाऊंचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले – आनंदीबाई जोशी – लता मंगेशकर – मा. राष्ट्रपती प्रतिभा पाटील ताईंचा महाराष्ट्र, सिंधुताई सपकाळ – मेधा पाटकर – साधनाताई व मंदाकिनी आमटेंचा महाराष्ट्र.महर्षी कर्वे – संत गाडगेबाबा – केशवसुतांचा महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरे – पु.ल.देशपांडे – आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र, सचिन तेंडुलकर – प्रकाश आमटे – शरद पवारांचा महाराष्ट्र, आण्णा हजारे – नाना पाटेकर – दादा कोंडकेंचा महाराष्ट्र.अजरामर इतिहास, अफाट शौर्य, अगणित योद्धे व क्रांतिकारी, अचंबिक करणारे शोधन करणारे शास्रज्ञ, उच्च कोटींचे कलाकार, अद्वितीय संस्कृती, शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेणारे महर्षी, निस्वार्थी समाजसेवक, भक्कम महिला शक्ती, लोकहितवादी राजकारणी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा, व बुद्धिमान प्रजेची शिदोरी लाभलेला आपला महाराष्ट्र.लिहावं तेवढं कमी, वाचावं तेवढं कमी, ऐकावे तेवढं कमी. महाराष्ट्राच्या इतिहासापासून आजपर्यंत च्या सर्व व्यक्तिमत्वांची माहिती आम्ही आपणासमोर घेऊन येणार आहोत जेणे करून संबंध महाराष्ट्र आपल्या सर्व नायकांशी जोडला जाईल. तसेच चालू स्थितीबद्दल नवनवीन बातम्या व माहिती, प्रत्येक क्षेत्रातील महाराष्ट्राची प्रगती आपल्यासर्वांसमोर आम्ही मांडणार आहोत.प्रयत्न आहे महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या पर्यंत न पोहोचलेल्या परंतु महाराष्ट्रातील सत्य घटना, इतिहास, वलोकांच्या कार्याशी HumansOf Maharashtra.com च्या माध्यमातून परिचित करून देण्याचा.जय महाराष्ट